रात्र चढत आहे, आणि आता माझ्या पहाऱ्याला सुरुवात होत आहे.
मी मरेपर्यंत तो संपणार नाही.
मी बायको करणार नाही, जमिनींचा मालक बनणार नाही, मुले जन्माला घालणार नाही.
मी मुकुट धारण करणार नाही, कोणताही गौरव मिळवणार नाही.
मी माझ्या कर्तव्यस्थानी जगेन, आणि मरेन.
मी अंधारातील तलवार आहे.
मी भिंतीवरील पहारेकरी आहे.
मी मानवी प्रांतांचे संरक्षण करणारी ढाल आहे.
मी या, आणि येणाऱ्या सर्व रात्रींसाठी माझे आयुष्य आणि माझी प्रतिष्ठा रात्र-पहारेकऱ्यांना समर्पित करण्याची प्रतिज्ञा करतो.